वेगवान नाशिक
नाशिक : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी बॅंकेतून १७ लाखांची रोकड चोरी गेल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास पूर्ण होत आला असला तरी अद्यापही मुख्य संशयित आरोपी फरार आहे. मात्र या गुन्ह्यातील 17 लाखांपैकी 14 लाख पोलिस तपासात हस्तगत करण्यात आले आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे परदेश प्रवासाचे स्वप्न होणार पूर्ण
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या चोरीच्या घटनेचा सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत असतांना मुख्य संशयित आरोपी हा महाराष्ट्रातील किंवा नाशिकमधील नसून तो मध्यप्रदेशातील असल्याचे समोर आले आहे.
ब्रेकिंग, राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानुसार पंचवटी पोलीसांच्या एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून त्यानुसार तांत्रिक मदती घेत मुख्य संशयित हा मध्यप्रदेश येथील असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली होती.
त्यादरम्यान या संशयिताच्या मध्यप्रदेश येथील घरावर नाशिक पोलीसांनी छापा टाकून चोरीला गेलेल्या पैशांपैकी चौदा लाख रुपये पोलीसांच्या हाती लागले आहे. तर यामध्ये आत्तापर्यन्त तिघा जणांची नावे समोर आली असून नाशिक पोलिस आरोपीच्या मागावर आहे.
वीर सावरकर वादानंतर संजय राऊतांचं मोठ विधान