वेगवान नाशिक
मनमाडः शहरात एका शेतक-यावर तरसाने हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. जगन सानप रा.बेजगाव अस या जखमी शेतक-याचे नाव आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे परदेश प्रवासाचे स्वप्न होणार पूर्ण
अधिक माहिती अशी की, शहरापासून 10 किमी अंतरावर असलेल्या बेजगाव येथे जगन सानप हा शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जात असताना त्याच्यावर अचानक तरसाने झडप घेऊन हल्ला केलं आहे. या शेतक-याने आरडाओरडा केला तेव्हा आवाज ऐकून इतर शेतकरी त्याच्या मदतीला धावून आले. त्यामुळे घाबरलेल्या तरसाने शेतातून पळ काढला आहे. आणि सुदैवाने सानप यांचे प्राण वाचले आहे.
ब्रेकिंग, राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी
दरम्यान यापूर्वी देखील तरसाने या भागात शेतकर्यावर हल्ले करत जखमी करण्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे वनविभागाने या तरसाला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वीर सावरकर वादानंतर संजय राऊतांचं मोठ विधान