वेगवान नाशिक
मालेगाव : शहरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने गोवंश जप्तीची कारवाई सुरु असून अशातच आता नऊ गोवंश व पिकअपसह चार लाख १७ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांना जप्त करण्यात यश आले आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे परदेश प्रवासाचे स्वप्न होणार पूर्ण
अधिक माहिती अशी की, मनमाड रस्त्याने शहरात कत्तलीसाठी पिकअपमधून गोवंश आणण्यात येत असल्याची माहिती गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांना मिळाली.त्यानंतर याबाबत शिर्के यांनी किल्ला पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर भदाणे यांना माहिती दिली असता त्यानुसार सापळा रचून मनमाड चौफुलीवर पोलिसांनी संशयावरुन एका पिकअपचालकाला हात देऊन थांबण्याचा इशारा केला.
LIC च्या या 3 योजनांमध्ये मिळणार बंपर फायदा
मात्र या चालकाने पोलिसांना चकवा देत न थांबता निघून गेला असता मनमाड चौफुलीच्या पुलाखालील वळणावर रस्त्याच्या कडेवर धडक बसून ही पिकअप थांबली. त्यावेळी पिकअपची तपासणी केली असता नऊ गोवंश कोंबलेल्या अवस्थेत मिळून आले आहे.
याप्रकरणी पोलिस शिपाई किशोर नेरकर, सचिन भामरे, भोये, बागूल आदींनी मध्यरात्री एकच्या सुमारास ही कारवाई केली असून एक लाख १७ हजार रुपये किमतीचे गोवंश व तीन लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप असा चार लाख १७ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
या तारखेपासून फेसबुक प्लॅटफॉर्मवर होणार हा मोठा बदल