वेगवान नाशिक
सध्या देशभरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे.त्यात सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच वाद पेटल्याचं चि६ पाहायला मिळत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली असून राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे परदेश प्रवासाचे स्वप्न होणार पूर्ण
दरम्यान याबाबत इंदौरमधल्या एका दुकानात हे पत्र आलं असून त्यात बॉम्बने उडवू अशी धमकी राहुल गांधी यांना देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारचे १५ महत्त्वाचे निर्णय
तर इंदौरमधल्या एका मिठाईच्या दुकानात हे निनावी पत्र पाठवण्यात आलं आहे. २४ नोव्हेंबरला राहुल गांधी इंदौरमध्ये जाणार आहेत. त्या आधी हे धमकीचं पत्र आल्यामुळे आता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस सतर्क झाले असून हे पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.
तसेच या आलेल्या धमकीनंतर पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजही चेक करण्यात येत असून त्या भागातली सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा लांबणीवर