वेगवान नाशिक
राज्यातील साखर कारखाने आणि साखर आयुक्तांकडे संघटनांनी मागण्यांचा रेटा लावला असून ऊसाच्या एकरकमी एफआरपी सहा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस तोडणी बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर जागोजागी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांच्या चाकांची हवा सोडून ऊस वाहतूक रोखण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे आज अपूर्ण कामं होणार पूर्ण
दरम्यान मागील हंगामातील उसाचे उर्वरित दोनशे रुपये द्या, दोन तुकड्यातील ‘एफआरपी’ बंद करा आणि साखरेच्या किमान दरात वाढ करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात कादवा सहकारी साखर कारखाण्यावर स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात ऊस वाहतूक रोखली असून नाशिक जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने बंद करण्यात आले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांना खूशखबर! कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ
तसेच उसाला एक रकमी एफआरपी मिळावी तसेच उत्पादकांची वजनामध्ये होणारी लूट थांबवावी व वाहतूकदारांची सुरू असलेली फसवणूक थांबवावी, त्याचबरोबर साखरेला केंद्र सरकारने पाच रुपयांचा अधिकचा भाव द्यावा,यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी ऊस तोडणी बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती. तर सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ठिकठिकाणी सुरू असलेली ऊस वाहतूक बंद पाडण्यात आली.
ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी