वेगवान नाशिक
नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडली होती. तर आता जिल्ह्यात सध्या ग्रामविकास विभागाकडून भरती प्रक्रिया केली जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य सरकार अंदाजे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील जागा भरणार असून त्यात राज्यातील जिल्हा परिषदांमधील सहा हजारांवर जागांची भरती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे आज अपूर्ण कामं होणार पूर्ण
त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत गट ‘क’ संवर्गातील दोन हजार ५३८ रिक्त जागांच्या ८० टक्के म्हणजे दोन हजार ३० जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.याबाबत ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १ ते ७ फेब्रुवारीदरम्यान भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून, यासाठी निवड मंडळाच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
तसेच जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेत सर्व विभागांच्या गट ‘क’ व गट ‘ड’ या संवर्गाच्या दोन हजार ७२६ जागा रिक्त आहेत. यामध्ये दोन हजार ५३८ जागा या गट ‘क’मधील आहेत, तर १८८ जागा गट ‘ड’मधील आहेत. ग्रामविकास विभागाने राज्यातील गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदांना मुभा दिली आहे.
गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठा बदल, ग्राहकांना मिळणार फायदा