वेगवान नाशिक
नाशिक : शहरातील जुना गंगापूर नाका परिसरात एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून आवेरा शुभम इंगळे ( १० महिने ) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे आज अपूर्ण कामं होणार पूर्ण
याबाबत अधिक माहीती अशी , जुना गंगापूर नाका परिसरातील राठी आमराई भागात असलेल्या श्री साई अपार्टमेंटमध्ये इंगळे कुटुंबीय राहतात. त्यांच्या घरात शनिवारी रात्री आवेरा हिच्या अंघोळीसाठी गरम पाणी काढण्यात आले असता या चिमुकलीचा धक्का लागल्याने पाणी तिच्या अंगावर सांडले. यामुळे ता गंभीररित्या भाजली गेली.
ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
त्यानंतर आवेराला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस पुढील तपास करीत आहेत.
या बॅंकेकडून कर्ज घेणे होणार महाग, व्याजदरात इतक्या टक्क्यांनी वाढ