वेगवान नाशिक
नाशिक : शहरात महामार्गावरील विल्होळी येथे एका ड्रायव्हरनेच ६६ लाखांची रक्कम लूटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे आज अपूर्ण कामं होणार पूर्ण
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १५ रोजी रात्रीच्या सुमारास कन्हयालाल चेतनदास मनवानी (७२, रा. सिंधी कॉलनी, होलाराम कॉलनी) हे नेहमीप्रमाणे निवासस्थानी जाण्यासाठी निघाले. तेव्हा त्यांच्याकडील पिशवीमध्ये व्यवहाराची ६६ लाख ५० हजार रुपयांची रोकड होती. त्यावेळी त्यांनी पिशवी घेऊन ते कारमध्ये (एमएच- १५- जीएन- ९५६७) बसले आणि ड्रायव्हर देवीदास मोहन शिंदे (रा. सातपूर) यास घरी जाण्यासाठी सूचना केली.
ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
त्यानंतर संशयित शिंदे कार घेऊन कुलकर्णी होलाराम कॉलनीकडे निघाला असता त्याने काही कारण नसताना डॉ. आंबेडकर चौकात कार थांबविली आणि काही क्षणात एक अज्ञात व्यक्ती कारचा मागील दरवाजा उघडून मनवानी यांच्या शेजारी बसला. त्या संशतियाने त्याच्याकडे असणारी बंदूक काढून मनवानी यांना लावली व आरडाओरडा न करण्याच सांगून कारचालक शिंदे याने कार पाथर्डी फाट्याच्या दिशेने नेली. त्यानंतर व्यावसायिकाला संशयितांनी कारसह महामार्गावरील विल्होळी येथील जैन मंदिराजवळ सोडून रोकड हिसकावून ते कारसह पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, सरकारवाडा ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून संशयितांचा शोध घेण्यासाठी शहर गुन्हे शाखेचे युनिट एक व दोनच्या पथकांसह सरकारवाडा गुन्हे शोध पथक सहायक निरीक्षक यतीन पाटील, गौतम सुरवाडे, उपनिरीक्षक मच्छींद्र कोल्हे, भटू पाटील, विशाल पवार,संतोष लोंढे, शैलेश गायकवाड, युवराज भोये हे शोध घेत आहेत. तसेच सदरील गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण हे करीत आहेत.
गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठा बदल, ग्राहकांना मिळणार फायदा