मालेगावः धक्कादायक, तालुक्यात दाम्पत्याचा संशयास्पदरित्या आढळला मृतदेह


वेगवान नाशिक

मालेगाव : सध्या नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काही दिवसांपासून दररोज काही ना काहीतरी घटना घडल्याचं दिसून येत आहे. अशातच मालेगाव तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली असून हिंगलाजमध्ये नवरा बायकोचा संशयास्पद मृत्यू  झाल्याची घटना उघड झाली आहे.

Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे आज अपूर्ण कामं होणार पूर्ण

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील हिंगलाज नगरमध्ये अलताब हुसेन मोहम्मद सईद आणि अल्कमा अलताब हुसेन हे दाम्पत्या राहत होते. तेव्हा पहाटेच्या सुमारास या दाम्पत्याचे मृतदेह राहत्या घरात आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

याबाबच पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली असून पोलिसांनी केलेल्या पाहणीमध्ये अल्कमा अलताब हुसेन या महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला आहे. त्यामुळे या दाम्पत्याची कुणी हत्या केली? की त्यांच्यासोबत आणखी भलतंच काही घडलंय का, याचा छडा लावण्याच्या अनुषंगाने पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान या घडलेल्या घटनेतील दाम्पत्य वयस्कर असून ते एकटेच घरात राहत होते. त्यामुळे या संशयास्पदरित्या झालेल्या मृत्यूचं गुढ शोधून काढणे पोलिसांसमोर आव्हानचं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना खूशखबर! कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ

 

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *