वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे,
मनमाड,नांदगाव –
नांदगाव तालुक्यातील पहिल्या खाजगी बाजार समितीला शासनातर्फे परवाना मिळाला आहे.नांदगाव तालुक्यातील पोखरी येथील नियोजित सानप कृषी खाजगी बाजार समितीचा परवाना पणन संचालक सुनील पवार यांच्या हस्ते कासारी ता.नांदगाव जि.नाशिक येथील शेतकरी व कासारी ग्रामपंचायतचे सरपंच हेमंत सानप यांना प्रदान करण्यात आला.
गावातील तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त चांगला मोबदला मिळवून देण्यासाठी ह्या खाजगी बाजार समितीची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी व व्यापारी यांचा योग्य समन्वय साधला जाईल तसेच येणाऱ्या काळात नांदगाव तालुका तसेच परिसरातील शेतकऱ्यांचा आर्थिक उत्कर्ष घडवण्याचा आपला मानस असल्याचे हेमंत सानप ह्यांनी सांगितले.