या बॅंकेकडून कर्ज घेणे होणार महाग, व्याजदरात इतक्या टक्क्यांनी वाढ


वेगवान नाशिक

नवी दिल्लीः एकीकडे बँक फिक्स्ड डिपॉझिट (FD) वर व्याजदर वाढवत असताना, दुसरीकडे MCLR देखील वाढवत आहे, ज्यामुळे ग्राहकांसाठी सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत. आता देशातील सर्वात मोठी बँक SBI ने कर्ज महाग केले असून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना आता कर्जावरील वाढीव ईएमआय भरावा लागेल. तसेच SBI ने सर्व मुदतीसाठी MCLR वाढवला असून बँकेने MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवला आहे.

Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे आज अपूर्ण कामं होणार पूर्ण

यामुळे ग्राहकांसाठी सर्व प्रकारची कर्जे महाग होतील. गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचे व्याजदर MCLR च्या आधारे ठरवले जातात. वाढलेले दर 15 नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून लागू झाले आहेत.

तसेच SBI ने एक महिना आणि तीन महिन्यांचा MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवला आहे. या वाढीसह, दोन्ही कालावधीसाठी MCLR 7.75 टक्क्यांवर गेला आहे. यापूर्वी याच कालावधीसाठी MCLR 7.60 वर होता. त्याच वेळी, बँकेने सहा महिन्यांचा MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवून 8.05 टक्के केला आहे, जो 7.90 टक्के होता.

गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठा बदल, ग्राहकांना मिळणार फायदा

त्याचप्रमाणे, दोन वर्षांचा आणि तीन वर्षांचा MCLR, जो पूर्वी अनुक्रमे 8.15 टक्के आणि 8.25 टक्के होता, आता 0.10 टक्क्यांनी वाढला आहे. तो आता 8.25 टक्के आणि 8.35 टक्के झाला आहे. एसबीआयने एका अधिसूचनेत ही माहिती दिली आहे. एक महिना आणि तीन महिन्यांचा MCLR अनुक्रमे 0.15 टक्क्यांनी वाढून 7.75 टक्के झाला आहे. सहा महिन्यांचा MCLR 0.15 टक्क्यांनी वाढून 8.05 टक्क्यांवर पोहोचला आहे.

ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *