वेगवान नाशिक
औरंगाबाद : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक प्रदीप पोटे, भरारी पथकाचे निरीक्षक विजय रोकडे यांना गणोरी व निधोना शिवारांत शेतकरी गांजाचे उत्पन्न घेत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून ऊस, कापसाच्या पिकांत ‘गांजा’ची शेती जोमात करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
Astrologyआजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे आज अपूर्ण कामं होणार पूर्ण
त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने फुलंब्री तालुक्यातील गणोरी, निधोना शिवारांतील तीन शेतकऱ्यांच्या शेतात छापा मारून तब्बल ६६ लाख रुपयांचा ६५८ किलो गांजा पकडल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणी तीन शेतकऱ्यांविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या बॅंकेकडून कर्ज घेणे होणार महाग, व्याजदरात इतक्या टक्क्यांनी वाढ
दरम्यान याबाबत माहिती मिळाल्यानंतर अधीक्षक संतोष झगडे यांच्या नेतृत्वात सर्व विभागांच्या निरीक्षकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. या छाप्यात गणोरी शिवारातील रामभाऊ अमृता तांदळे (रा. गणोरी, ता. फुलंब्री) याच्या शेतात गांजाची ४५ झाडे आढळली असून या झाडांचे वजन तब्बल ५२० किलो होते.
ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
त्यानंतर दुसरी कारवाई निधोना शिवारात करण्यात आली असून त्या ठिकाणी सुखलाल जंगाळे (रा. निधोना) याच्या शेतात ४० झाडे आढळली. या झाडांचे वजन ५३ किलो भरले; तर तिसरी कारवाई याच शिवारातील कारभारी गुसिंगे याच्या शेतात केली असून त्या ठिकाणी गांजाची २२ झाडे आढळली. असे एकूण १०७ झाडांचे एकूण ६४८ किलो वजन भरले असून या सर्व गांजाची किंमत ६६ लाख ५ हजार रुपये आहे.
याबाबत आरोपी शेतकऱ्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविल्याचे अधीक्षक झगडे यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी अधिक तपास निरीक्षक रोकडे करीत आहेत.
गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठा बदल, ग्राहकांना मिळणार फायदा