मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर राष्ट्रवादीच्या या नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले..


वेगवान नाशिक

नाशिक : सध्या आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना भेटत नसल्याने त्यांवर शिंदे गटाच्या आमदारांनी आरोप केला होता. त्यामुळे राज्यात उद्धव ठाकरे यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या टिका केल्या जात होत्या. तशाच परिस्थिती सध्या निर्माण झाली असून  छगन भुजबळ यांनी केलेला आरोप शिंदेंना लागू होत असल्याची एक प्रकारे तुलना केली जात आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज

दरम्यान  मलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देत नाही असा दावा भुजबळांनी केला असून मी कॉल केल्यावर कॉल ही घेत नाही, याशिवाय मॅसेजला कधीतरी रिप्लाय करतात असं भुजबळ यांनी म्हंटले आहे.

Nashik जिल्ह्यातील चौदा बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला

तसेच याआधी उद्धव ठाकरे भेटत नाही, अशी तक्रार शिंदे गटातील नेते करत होते. मात्र मला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटच देत नाहीय. त्यामुळे त्यांना भेटावे कसे, याचा मार्गच मला सापडत नाहीये, असा टोला छगन भुजबळांनी लगावला आहे.

यावरून आता धुसफूस समोर येऊ लागली असून, ही धुसफूस विरोधकांची असली तरी प्रत्यक्षात अनेक आमदार हे भेटीवरुन नाराजी व्यक्त करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

Stock Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ३०० अंकांच्या खाली

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *