केंद्रातील 2 मंत्रिपदं आणि राज्यपालपदाच्या मागणीवरून राष्टवादीच्या या नेत्याचा शिंदेंना टोला


वेगवान नाशिक

सध्या राज्यात शिंदे गटाकडून भाजपाकडे केंद्रात दोन मंत्रिपद आणि दोन राज्यपाल पदांची मागणी करण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असून यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी शिंदेंना टोला लगावला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज

तटकरे म्हणाले,  केंद्रात दोन मंत्रीपद आणि दोन राज्यपाल पदांच्या शिंदे गटाचा बालहट्ट असून तो भाजपने पुरवावा.     अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी टोला लगावला आहे. तसेच राज्यपाल पदासाठी शिंदे गटाकडे लायक असणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे   यापेक्षा जास्तीची मागणी शिंदे गटानी केली पाहिजे, असं म्हणत तटकरेंनी  शिंदेंना टोला लगावला आहे.

Stock Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ३०० अंकांच्या खाली

त्यानंतर एकनाथ शिंदे सर्व आमदारांची मनस्थिती ठीक करण्यासाठी हतबल झालेत. त्यामुळे त्यांनी आमदारांसाठी फडणवीसांचं मार्गदर्शन ठेवलं असेल. या चिंतन शिबीराचा लाभ सर्व आमदारांना मिळेल आनंदाची गोष्ट आहे. पण या मार्गदर्शनाची गरज कुणाला वाटली? शिंदे गटाला कि फडणवीसांना? हे मला माहित नाही, असंही तटकरे म्हणाले आहेत.

पीक विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्याचे निर्देश – अब्दुल सत्तार

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *