Nashik जिल्ह्यातील चौदा बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला


वेगवान नाशिक

नाशिकः  राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम ठरला असून त्यानंतर आता जिल्ह्यातील चौदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांकडे नाशिक जिल्ह्यातील सगळ्या शेतक-यांचे लक्ष लागून होते. अशातच आता जिल्ह्यातील या बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून जिल्ह्यात या निवडणुकींचा गुलाल उधळणार आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज

तसेच या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्र ढवळून निघणार आहे. तर यामध्ये नाशिक , पिंपळगाव बसवंत, लासलगाव या मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश असून यासह सिन्नर , येवला , नांदगाव , मनमाड , चांदवड ,देवळा , घोटी , दिंडोरी, कळवण , सुरगाणा व मालेगाव या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक पदाच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

Stock Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ३०० अंकांच्या खाली

यासाठी प्रारूप मतदार याद्या सोमवार दि.१४ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या असून कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मतदार यादीचा  कार्यक्रम जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. सतीश खरे  यांनी जाहीर केला आहे.

त्यानुसार प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तसेच दि.२३ नोव्हेंबरपर्यंत त्यावर हरकती नोंदविता येणार असल्याचं सांगितले असून दि.२४ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीमध्ये दाखल झालेल्या हरकतींवर निर्णय दिला जाणार आहे. आणि मग त्यानंतर दि.७ डिसेंबर रोजी या बाजार समित्यांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

ठाकरे गटाची ती याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *