वेगवान नाशिक
गेल्या दोन वर्षात राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने केंद्राने संपूर्ण देशात प्रत्येक ठिकाणी मास्क सक्ती लागू केली होती. त्यानंतर यंदाच्या वर्षात जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला तसतसे लावण्यात आलेले निर्बध हळूहळू करण्यात आले होते.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज
मात्र, केंद्राकडून विमानप्रवासादरम्यान मास्क परिधान करणे अनिवार्य होते. परंतु, आता विमानप्रवासादरम्यान प्रवाशाने मास्क परिधान करण्याची सक्ती मागे घेण्याची घोषणा केंद्राकडून करण्यात आली आहे.
यामुळे विमान प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पण मास्क सक्ती जरी मागे घेतली असली तरी, प्रवाशांनी शक्यतो मास्कचा वापर करावा असेही केंद्राने म्हटले आहे.
Stock Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ३०० अंकांच्या खाली