वेगवान नाशिक
मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर झालेल्या टिका टिपणीवर प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे. त्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृती दिन असल्याने या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवाजी पार्कात जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करणार आहेत.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज
यादरम्यान शिवसैनिकही मोठ्या प्रमाणावर असणार आहे. त्यामुळे यावेळी वाद होण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्र्यांनी आजच स्मृती स्थळावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत बाळासाहेबांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर हातातील खंजीर बाजूला ठेवून जा, असा टोला लगावला आहे.
ठाकरे गटाची ती याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली
तसेच राऊत म्हणाले की, कोणीही असतील त्यांनी हातातील खंजीर बाजूला ठेवूनच बाळासाहेबांना अभिवादन करावं. मी व्यक्तिगत नाव घेत नसून सर्वजण स्मृतीस्थळावर जाऊ शकतात पण चांगल्या मानाने जा, असा टोला त्यांनी लगावला. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडावर संताप व्यक्त केला असून महाराष्ट्रातील मुलीची हत्या धक्कादायक आणि दुर्देवी आहे. तसेच कोणत्या धुंदीत आणि गुंगीत ही मुलं जगत आहेत. हे आज परत एकदा कळलं, असं ते म्हणाले आहे.
राऊत पुढे म्हणतात, जे खूनी आणि हत्यारे आहेत त्यांच्यावर खटलेही चालू नयेत. यांच्यावर राजकारण कोणी करत असेल तर बंद केले पाहिजे. खटले न चालवता परिस्थितीजन्य पुराव्यावरून खुन्यांना फासावर लटकवले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात कोणत्याही प्रकारचं राजकारण करू नये, असं आवाहन त्यांनी केलं.
Stock Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ३०० अंकांच्या खाली