वेगवान नाशिक
गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरूंगात आहेत. त्यांच्या बद्दल आणखी एक बातमी समोर आली असून मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज
एनसीबीचे मुंबईचे माजी संचालक समीर वानखडे यांच्या कुटुंबियांची बदनामी केल्याप्रकरणी वाशिम सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या विरुद्ध अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नवाब मलिक यांच्याविरोधात वाशिम शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
दरम्यान 13 डिसेंबर 21 रोजी वाशिम न्यायालयात वानखडे कुटुंबीयांनी यासंबंधित याचिका दाखल केली होती. तर त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली असून जामीन अर्जदेखील कोर्टाने फेटाळली आहे.
Stock Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ३०० अंकांच्या खाली
तसेच समीर वानखेडे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक केली होती. तेव्हा संबंधित प्रकरण प्रचंड गाजलं असल्यानं या प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यात मलिक यांच्या जातीचे कादगपत्रे समोर आणत त्यांनी खोटे कागदपत्रे सादर करत नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप केला होता.
Nashik जिल्ह्यातील चौदा बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला