वेगवान नाशिक
नाशिकः अर्थव बंगला तुलसी आय हॅास्पिटल शेजारी हॅपी होम कॅालनी द्वारका नाशिक येथे २ लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज
मिळालेल्या माहितीनुसार, अर्थव बंगला तुलसी आय हॅास्पिटल शेजारी हॅपी होम कॅालनी द्वारका नाशिक या ठिकाणी युशा अलताफ मोकाल यांच्या घरी दोन अनोळख्या इसमांनी बंगल्याचं मुख्य दरवाजा असलेल कुलुप कडी कोयंडा कशाने तरी तोडून घरात प्रवेश करून एकूण २ लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल हा त्यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरी करून नेला आहे.
Stock Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ३०० अंकांच्या खाली
सदर घटना सीसीटिव्हीद्वारे रेकॅार्ड झाल्याने त्यावरून दोन अनोळखी इसमांविरूद्ध मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरिक्षक रोहकले , पोलिस उपनिरिक्षक गिते, पो.हवालदार सोनार यांनी भेट देत अधिक माहिती जाणून घेतली असून याबाबत पोलिस उप निरि७क डिपी गिते अधिक तपास करीत आहे.
पीक विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्याचे निर्देश – अब्दुल सत्तार