वेगवान नाशिक
नाशिक : जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण खूपच प्रमाणात वाढताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचं उघड झालं आहे. अशातच जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मागच्या आठवड्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती. पण एटीएम फोडत असतांनाच पोलीस गस्तीवर असल्याने सायरन वाजल्याने चोरटे पसार झाले होते.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज
याबाबतच सिसिटीव्हीच्या आधारे मालेगाव पोलीसांनी पाच संशयित आरोपींना अटक केली असून यामध्ये चार अल्पवयीन आरोपी आहे. तसेच एटीएम फोडण्याच्या प्लॅन आखलेला संशयित आरोपी सुद्धा 19 वर्षांचा असून हुमैर आबीद शेख असं त्याचे नाव आहे.
Nashik जिल्ह्यातील चौदा बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या या संशयित आरोपींनी यू-ट्यूबवरील व्हिडिओ पाहून दोन दिवस एटीएम फोडीचा सराव केला असल्याची माहीता पोलीस तपासातून समोर आली आहे. या घटनेचा मास्टर माइंड असलेला हुमैर आबीद शेख याला मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तसेच या घडलेल्या प्रकारात अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याने चिंता व्यक्त केली जात असून पोलीसांनी कठोर पाऊले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Stock Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ३०० अंकांच्या खाली