मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला लासलगाव पोलीसांनी केले जेरबंद


वेगवान नाशिक

लासलगाव प्रतिनिधी

मोबाईल चोरी करणाऱ्या मध्यप्रदेश राज्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला लासलगाव पोलीसांनी जेरबंद केले आहे.या कारवाईत सदर आरोपींकडून १,१३,०००/- रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती स. पो.नि. राहुल वाघ यांनी दिली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार, रविंद्र बाबुगिरी गोसावी, रा.जोपुळ ता. चांदवड, जि.नाशिक यांच्या फिर्यादी वरुन लासलगाव पोलीस ठाण्यात भादवि कलम ३७९ प्रमाणे दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. लासलगाव येथील आठवडे बाजारातुन मोबाईल चोरी जात असल्याने त्यास प्रतिबंध होण्यासाठी शहाजी उमाप,पोलीस अधीक्षक,नाशिक ग्रामीण,माधुरी कांगणे,अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व सोमनाथ तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड यांनी आदेशित केल्या प्रमाणे लासलगाव आठवडे बाजारात गस्तकामी सहा.पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अजिनाथ कोठाळे, नंदकुमार देवडे पोहवा/ कैलास महाजन, पोलीस कॉन्टेबल प्रदिप आजगे, भगवान सोनवणे, सागर आरोटे, सुजय बारगळ, दगु शिंदे यांचे पथक लासलगाव शहरामध्ये आठवडा बाजार रविवारी गस्त करत होते.

Stock Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ३०० अंकांच्या खाली

त्यादरम्यान त्यांना दोन संशियत इसम वावरतांना मिळुन आल्याने त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव जिददी साबुददीन पारधी (वय २०),विरेंद्र लखन सिलारे (वय २४) दोन्ही रा.झिरी ता.जि.हरदा राज्य मध्यप्रदेश असे सांगितले.

त्यावेळी त्यांच्याकडे फिर्यादीचे मोबाईल बाबत विचापुस केली असता त्यांनी सुरूवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्यांची सखोल चौकशी करताच त्यांनी लासलगाव आठवडे बाजारातुन फिर्यादाचा मोबाईल फोन चोरी केल्याबाबत कबुली दिली. तसेच त्यांनी नाशिक जिल्हयातुन इतर आठवडे बाजारातुन मोबाईल फोन चोरी केल्याबाबत देखील कबुली दिली असुन त्यांच्याकडुन सुमारे १,१३,००० रु किमंतीचे ०९ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहे.

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

यापुर्वी देखील आवठवडे बाजारातुन झारंखड राज्यातील सराईत मोबाईल चोरी करणारे आरोपींना लासलगाव पोलीसांनी अटक करुन त्यांचेकडुन २४ मोबाईल फोन सुमारे ३,३१,००० मुददेमाल जप्त करण्यात आले होते. या दोन्ही आरोपींना मा. न्यायालय निफाड येथे हजर केले असता दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असुन गुन्ह्याचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अजिनाथ कोठाळे, पोकॉ भगवान सोनवणे हे करीत आहे.

पीक विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्याचे निर्देश – अब्दुल सत्तार


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *