वेगवान नाशिक
नवी दिल्ली : वाढत्या महागाईमुळे इंधनाच्या दरात सतत चढ उतार सुरू असतो. त्यामुळे देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांना चांगलीच मागणी दिसत आहे. बरेच जण कार खरेदी करण्यासाठी इच्छुक असतात पण वाहनांच्या वाढत्या किमतीमुळे ते कार खरेदी करू शकत नाही. परंतु पीएमव्ही इलेक्ट्रिक कंपनीने वाहन खरेदी ग्राहकांसाठी चांगली बातमी आणली असून भारतीय बाजारात देशातली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज
ही इलेक्ट्रिक कार देशातली सर्वात किफायतशीर कार असून या कारचं नाव PMV EaS-E असं आहे. या कारची किंमत किंमत ४.७९ लाख रुपयांपासून सुरू होते. ही एक्स शोरूममधली किंमत आहे. चला तर जाणून घेऊया या कारमध्ये तुम्हाला कोणकोणते फीचर्स मिळणार आहेत.
या कारची ४.७९ लाख रुपये ही इंट्रोडक्टरी किंमत असल्याचं कंपनीने म्हटलं असून सुरुवातीच्या १० हजार ग्राहकांनाच ही कार ४.७९ लाख रुपयांमध्ये मिळेल. कारण ही कार लाँच करण्याआधीच कंपनीला या कारसाठी ६ हजार बुकिंग्स मिळाले आहेत.
पीक विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्याचे निर्देश – अब्दुल सत्तार
फिचर्स
या कारमधील फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट, डिजीटल इन्फोटेन्मेंट सिस्टिम, एअर कंडीशनिंग, रिमोट पार्क असिस्ट, रिमोट कीलेस एंट्री, क्रूझ कंट्रोलसारखे फीचर्स यात देण्यात आले आहेत. तसेच या कारमध्ये वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड्स, ब्लुटूथ कनेक्टिव्हिटी, फीट-फ्री ड्रायव्हिंग, ऑनबोर्ड नेव्हिगेशन देण्यात आलं आहे. यात म्युझिक आणि कॉल कंट्रोलसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
या कारच्या ड्रायव्हिंग रेंजबद्दल बोलायचं झाल्यास ही कार कंपनीने एकूण तीन बॅटरी ऑप्शन्समध्ये सादर केली आहे. ही मायक्रो इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जवर १२० ते २०० किलोमीटर पर्यंतची रेंज देते. यातली बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ तास लागतात. ही कार तुम्ही कोणत्याही 15A आउटलेटद्वारे चार्ज करू शकता. तसे कंपनीकडून यामध्ये 3kW AC चार्जर देण्यात आला आहे.
Stock Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ३०० अंकांच्या खाली