विनायक मेटे अपघातप्रकरणी चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल


वेगवान नाशिक 

मुंबई : मागील तीन महिन्यांपूर्वी  शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा कार अपघात झाल्याची घटना घडली होती. तर आता या प्रकरणी  तीन मोठी कारवाई करण्यात आली असून विनायक मेटे यांच्या कार चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा हा सीआयडीने  दाखल केला आहे. याबाबत रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलीस स्टेशनमध्ये चालक एकनाथ कदम याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून राज्य सीआयडीने कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करून लवकरच कार चालक एकनाथ कदम याला ताब्यात घेतलं जाणार आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज

दरम्यान विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु तिथे विनायक मेटे यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली होती. तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मेटे यांच्या मृत्युची सखोल चौकशी करण्यात येईल असं जाहीर केलं होतं.

Stock Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ३०० अंकांच्या खाली

तसेच काही दिवसांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करुन आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिले होते. यानंतर सीआयडी या प्रकरणाची चौकशी करत असताना त्यादरम्यान मेटे यांची कार ज्या ज्या मार्गावरुन गेली होती तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फूटेज सीआयडी तपासत होती.

या तपासात सीआयडीने पाहिलेल्या फूटेजमध्ये हा चालक ताशी 120 ते 140 किमी वेगाने गाडी चालवत असल्याचं दिसत असल्याने  ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच्या थोडा वेळ आधी चालक एकनाथ कदमने उजवा टर्न घेऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता.  सीआयडीच्या तपासात या बाबी समोर आल्यानंतर त्यांनी रसायनी पोलिसांमध्ये विनायक मेटे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

Nashik जिल्ह्यातील चौदा बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *