वेगवान नाशिक
नवी दिल्लीः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील सर्व सार्वजनिक, खाजगी आणि सहकारी क्षेत्रातील बँकांचे नियमन करते. ते त्यांच्यासाठी नियम ठरवते आणि त्यांचे उल्लंघन झाल्यास कारवाई देखील करते. रिझर्व्ह बँकेने सोमवारी जारी केलेल्या एका वेगळ्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, विविध बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांनी नऊ सहकारी बँकांना सुमारे 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता
तसेच नियामक अनुपालनातील त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. या कृतीचा उद्देश या बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे नाही. रिझव्र्ह बँकेकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांविरुद्ध यापूर्वीही अशीच पावले उचलण्यात आली आहेत.
रेल्वे मंत्रालयाचा अनारक्षित तिकिटांबाबत मोठा निर्णय
कोणत्या बँकांचा सहभाग आहे?
रिझर्व्ह बँकेने बेरहामपूर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड (ओडिशा) वर रु.3.10 लाख, उस्मानाबाद जनता सहकारी बँक, महाराष्ट्राला रु.2.5 लाख आणि संतरामपूर अर्बनला रु.2 लाख दंड ठोठावला. तर को-ऑपरेटिव्ह बँक लि., महिसानगर (गुजरात) ला लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच रिझर्व्ह बँकेने दंड ठोठावलेल्या बँकांमध्ये जिल्हा सहकारी केंद्रीय बँक मर्यादित, बालाघाट (मध्य प्रदेश), जमशेदपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., जमशेदपूर (झारखंड) आणि रेणुका नागरीक सहकारी बँक मरियडित, अंबिकापूर (छत्तीसगड) यांचा समावेश असून रिझर्व्ह बँकेने या बँकांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन संशोधनाला चालना देणे आवश्यक- चंद्रकांत पाटील
तर रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, कृष्णा मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मध्य प्रदेश आणि केंद्रपारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, ओडिशा यांना 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दुसरीकडे, नवानगर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, गुजरातला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा