वेगवान नाशिक
सिन्नरः तालुक्यातील पांढुर्ली येथील उपबाजारात एका व्यापा-याने परिसरातील शेतक-यांना ५० लाखांचा गंडा घालून पळ काढण्याची घटना घडली आहे. सिन्नर बाजार समितीच्या उपबाजारात टोमॅटोचे लिलाव होतात. या उपबाजारात नाशिक संगमनेरचे मुंबई येथील व्यापारी थेट व्यापा-यांकडून टोमॅटो सारखा शेतमाल खरेदी करतात.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता
तर शेतक-यांऐवजी खरेदी कारणा-या व्यापा-यांकडून आडत घेण्याचा निर्णय झाल्यानंतरही पांढुर्लीतील उपबाजारात व्यापा-यांकडून चार टक्के आडत घेतली जात नाही. जास्तीत जास्त व्यापारी उपबाजारात खरेदीसाठी यावे व शेतक-यांना जास्तीत जास्त भाव मिळावा म्हणून बाजार समितीकडून हे पाऊल उचलण्यात आलं असून कुणाही व्यापराविना आणि शेतक-यांकडून शेतमाल खरेदी करावा अशी बाजार समितीचे धोरण राहीले आहे.
देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन संशोधनाला चालना देणे आवश्यक- चंद्रकांत पाटील
याचाच फायदा घेऊन दिल्लीच्या एका व्यापा-याने बाजार समितीसह शेतक-यांनाही उल्लू बनवले आहे. दिल्लीहून आलेल्या या व्यापा-याने विनय ट्रेडिंग नावाने कंपनी खोलून कंपनीच्या नावाने शेतक-यांकडून टोमॅटोची खरेदी केली. शेतक-यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने बेलुचाच एक व्यापारी भागीदार म्हणुन घेतला. याच भागीदाराच्या भरोशावर साध्या कागदावर लिहून दिल्यानंतरही शेतक-यांनी आपले टोमॅटो या व्यापा-याला विकले.
दरम्यान दिवाळीच्या काळात टोमॅटोला ६०० ते ७०० रू.चा भाव मिळाला. त्यावेळी या व्यापा-याने शेतक-यांकडून उधारीत टोमॅटो खरेदी करत एक दोन ट्रक टोमॅटो या व्यापा-याने उपबाजारातून दिल्लीली रवाना केले. त्यावेळी दहा ते बारा दिवसात पैसे देण्याचा शब्द दिला होता पण पैसे मिळण्याचे दिवस जवळ आल्यानंतर पाच तारखेपासून हा व्यापारी उपबाजारात फिरकला नसून त्याचा मोबाीलही नॅाटरिचेबल लागत असल्याने परिसरातील शेतक-यांची ५० लाखांहून अधिक रक्कम या व्यापा-याकडे अडकली असून बाजार समितीने शेतक-यांची अडकलेली पैसे काढून देण्याची मागणी परिसरातील शेतक-यांनी केली आहे.
अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा