जितेंद्र आव्हाड यांच्या विनयभंगप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन


वेगवान नाशिक

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात वाद सुरू असून आव्हाड  यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार  यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता

ते म्हणाले  तुमच्यासमोरच हे सगळं घडलं.. कृपया राजकीय आकसापोटी अशी कारवाई योग्य नव्हे, अशी नाराजी शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंकडे व्यक्त केली आहे.

तसेच ‘हर हर महादेव’ चित्रपटाला केलेल्या विरोधानंतर आणि मॉलमधील राड्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली. याप्रकरणीही शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. त्यावर महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यात राजकीय आकस अजिबातच नाही, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांना दिल आहे.

देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन संशोधनाला चालना देणे आवश्यक- चंद्रकांत पाटील

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *