वेगवान नाशिक
नाशिक : सध्या महाराष्ट्रात घटस्फोटाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ होत असल्याने ही एक चिंताजनक बाब बनली आहे. त्यात नाशिक शहारात गेल्या पाच वर्षात 6 हजार 638 इतके घटस्फोटांचे दावे कौटुंबिक न्यायालयात दाखल झाले आहेत. हे सर्व समाज माध्यमांच्या अतिवापराचे परिणाम असून फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युब वर सातत्याने सर्फिंग करत राहिल्याने पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होताना दिसत आहेत.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता
दरम्यान कौटुंबिक आणि वैयक्तीक कारणामुळे अनेक जोडप्यांमध्ये वाद होतात आणि विषय घटस्फोटापर्यंत पोहचतो. मात्र, आता मोबाईल फोनमुळे संसार तुटू लागले आहेत. कारण सध्याची पिढी मोबाईलच्या खूप मोठ्या प्रमाणात आहारी गेली आहे. त्यामुळे आता हेच मोबाईलफोन घटस्फोटाचे कारण ठरत आहे, असं समुपदेशकांचे म्हणणं आहे.
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांबाबत एकनाथ शिंदेनी केली ही घोषणा
तसेच रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर चॅट करणे त्यातच मोबाईलला पासवर्ड लावल्याने अनेक संशय पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होताना दिसतात. यामुळे कुटुंब न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी केसेस दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. तर नाशिक शहरात कुटुंब न्यायालयामध्ये गेल्या पाच वर्षात 50% वरून अधिक केसेस या विषयाशीच संबंधित असल्याचं म्हटलं जात आहेत.
रेल्वे मंत्रालयाचा अनारक्षित तिकिटांबाबत मोठा निर्णय