वेगवान नाशिक
मुंबईः तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्याकरीता महत्वाची बातमी आहे. प्रवास करायचा म्हटलं तर प्रवाशांना आधी तिकीट बुक करावे लागते आणि त्याकरता स्टेशनला जाऊन रांगेत उभे राहून मग तिकीट मिळायचे. म्हणुनच भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वेच्या काही महत्वाच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता
यामध्ये रेल्वे मंत्रालयाने अनारक्षित तिकिटांबाबत निर्णय दिला असून त्यात तुम्हाला आता पूर्वीपेक्षा जास्त अंतरावरून अॅपद्वारे घरी बसून तिकीट बुक करू शकाल. म्हणजे ज्या स्थानकापासून तुम्हाला प्रवास सुरू करायचा आहे, त्या स्टेशनपासून तुम्ही खूप दूर असलात तरीही तुम्ही तिकीट बुक करू शकता.
त्यामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचणार असून प्रवाशांची तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्यापासून सुटका होणार आहे. तसेच रेल्वेच्या नव्या नियमामुळे तिकीट बुकिंग सुविधा अत्यंत सुलभ होणार आहे.
देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन संशोधनाला चालना देणे आवश्यक- चंद्रकांत पाटील
दरम्यान, रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षित आणि अनारक्षित अशी दोन प्रकारची तिकिटे बुक केली जातात. त्यात आरक्षित तिकिटे ऑनलाइन किंवा अॅपद्वारे कुठूनही कोणत्याही ठिकाणासाठी बुक केली जाऊ शकतात, परंतु अनारक्षित तिकिटे प्रवास सुरू होण्याच्या स्थानकापासून मर्यादित अंतरापर्यंतच बुक करता येतात. मात्र आता दोन किमीचे अंतर 20 किमी करण्यात आले आहे.
धनुष्यबाण चिन्हावरील ठाकरेंच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी