वेगवान नाशिक
इगतपुरीः तालुक्यात दोन दिवसापूर्वी मैत्रिणाकडे जाते असे सांगून एक महिला घोटी शहरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. संगिता शिवाजी गुंजाळ (४७) असं त्या महिलेचं नाव याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता
त्यानंतर दिनांक १५ रोजी सकाळच्या सुमारास बेपत्ता संगिता गुंजाळ या महिलेचा मृतदेह भावली धरणात आढळून आला आहे. त्यामुळे तालुक्यातील तळोशी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या मृत महिलेचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून या महिलेचा मृतदेह पुढील तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
रेल्वे मंत्रालयाचा अनारक्षित तिकिटांबाबत मोठा निर्णय
याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन संशोधनाला चालना देणे आवश्यक- चंद्रकांत पाटील