वेगवान नाशिक
नवी दिल्ली : मागील काही दिवसापूर्वी शिवसेना पक्षाच नाव व पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आलं होत. यावरून ठाकरे गटाने आवाज उठवला असून या विरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार असून याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागल आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता
तसेच पोटनिवडणूक लढण्यासाठी पक्षचिन्ह गोठवण्यात आलं होतं. मात्र शिंदे गटाने आपला उमेदवारच या निवडणुकीत दिला नसल्याने आता पोटनिवडणूक संपली असून ताप्तुरता निर्णय पुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीवर दिल्ली हायकोर्ट आता काय निर्णय घेतं? ठाकरे गटाला पुन्हा धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्याची परवानगी मिळते का? शिवसेना हे पक्षाचं नाव वापरण्यास मिळणार का? याबाबत दिल्ली हायकोर्टात नेमकं काय घडतं, हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन संशोधनाला चालना देणे आवश्यक- चंद्रकांत पाटील
दरम्यान चिन्ह गोठवण्याच्या प्रक्रियेविरोधात आता दोन्ही बाजूंना लेखी स्वरुपात बाजू मांडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याआधी सोमवारी ठाकरे गटाने आपला युक्तिवाद दिल्ली हायकोर्टात केला होता. त्यावेळी धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव या दोन्ही वापरण्यास पुन्हा परवानगी द्यावी, अशी अप्रत्यक्ष मागणी करण्यात आली आहे.
अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा