वेगवान नाशिक
राज्यात सध्या मंत्रिमंडळांचं बैठकीचं सत्र सुरू आहे. त्यामध्ये अनेक निर्णय घेतले जात असून तशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घोषणा देखील करत आहे. तर या बैठकीच्या चर्चासत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज उभारलं जाईल अशी घोषणा केली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे अनेक अडचणी आल्या. त्यामुळे या दोन वर्षात आलेल्या अनुभवानंतर आपण हा निर्णय घेत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आहे.
त्यानंतर एकनाथ शिंदे कार्यक्रमात बोलताना म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारलं जाणार आहे.कारण कोरोनाच्या काळात डॉक्टरांची संख्या कमी पडली होती. त्यामुळे आपण हा निर्णय घेण्यात आलं असल्याचं शिंदे म्हणाले आहे.
रेल्वे मंत्रालयाचा अनारक्षित तिकिटांबाबत मोठा निर्णय
तसेच आमचं सरकार येऊन तीन चार महिने झालेत तरी लोकांना बदल जाणवतोय की हे सरकार लोकांसाठी काम करणारं आहे. तस आपलं काम २४ तास सुरू असतं, महाराष्ट्र आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन संशोधनाला चालना देणे आवश्यक- चंद्रकांत पाटील