वेगवान नाशिक
राज्यातील राजकारणात सध्या घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. एकामागून एक वाद पेटत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच चिघळल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यात शिवसेनेने बेईमानी केल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या कार्याचा आढावा घेताना, फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता
फडणवीस म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा भाजपसोबत एकत्र आली असल्याने या परिवर्तन काळात एक नेता ताकदीने आपल्या पाठिशी होता. त्या नेत्यावर आज एक पुस्तक प्रकाशन होतं आहे. तसेच 2014 साली मिळालेले यश मोदीजींचे नेतृत्व आणि अमित शाह यांच्या कर्त्तृत्वामुळे आहे.
तसेच आपण शिवसेनेसोबत युती करायला तयार होतो. पण शिवसेनेने चार जागांसाठी युती तोडली.असा दावा देवेंद्र फडणवासांनी केला आहे.
रेल्वे मंत्रालयाचा अनारक्षित तिकिटांबाबत मोठा निर्णय
त्यानंतर फडणवीसांनी प्रकाशित पुस्तक संग्रह करुन ठेवण्यासारखे असून पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे कुठलेही पान उघडले तरी ज्ञानवर्धक अशी पुस्तकाची रचना असल्याचं म्हणाले आहे. तसेच खून की नदियां बही नही उलट विकासाची गंगा वाहत आहे. नक्षलवाद, पीएफआय, आतंकवादी विरोधात ज्याप्रकारे ते कारवाई करत आहेत. दृढता दाखवत आहेत, त्यामुळे देशांतर्गत सुरक्षेत प्रभावी झाला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देशातील या 9 सहकारी बँकांवर कडक कारवाई, 12 लाखांचा ठोठावला दंड