वेगवान नाशिक
सध्या अनेक कंपन्या आपल नवनवीन फोन बाजारात आणण्याच्या तयारीत असल्याचं दिसतात. त्यात वेगवेगळे फिचर्स, अॅप्स, यासह बजेटमध्ये असे एकापेक्षा एक सरस स्मार्टफोन लाँच करत आहे. त्यात असाच विवो कंपनीने आपला मोबाईल फोन बाजारात सादर करणार आहे. हा स्मार्टफोन भारतातही लाँच करण्यासाठी भारतीय डिव्हिजन तयारी करत आहे. या स्मार्टफोनला Vivo Y02 असं नाव असेल. हा एक बजेटच स्मार्टफोन असून लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमात धोका… astrology
Passionategeekz च्या रिपोर्टनुसार या स्मार्टफोनचा मॉडेल नंबर V2217 असं सांगण्यात आलं आहे. या डिव्हाइसची किंमत देशात 8449 रुपये असेल. तसेच विवोमध्ये मीडियाटेक हीलियो P22Soc असणार आहे. त्याची रॅमची क्षमता कमीत कमी 2 जीबी असेल. तर दुसरीकडे फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
तसेच स्टोरेज विस्तारासाठी मायक्रोएसडी कार्डही वापरता येईल. विवो एक्स्टरनल स्टोरेजसाठी 256 जीबी किंवा 512 जीबी मायक्रोएसी कार्डला सपोर्ट करेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फोनमध्ये दोन सिमकार्ड स्लॉट असतील.
या स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूला 8 एमपी आणि एलईडी फ्लॅश मॉड्यूल असेल. तसेच सेल्फीसाठी 5 एमपी फ्रंट कॅमेरा असेल. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी असेल असा दावा करण्यात आला आहे. तर डिस्प्लेला 1600*720 पिक्सेल एचडी+ रिझॉल्यूशन 6.51 इंच हेलो फूल व्ह्यू आयपीएस एलसीडी असू शकते. गुगलानी के यांच्या मते फोनमद्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि आय प्रोटेक्शन मोड असेल.
या शेअरने गुतवणूकदारांना एका वर्षात दिला बंपर परतावा