वेगवान नाशिक
मुंबईः राज्यात सध्या मध्यवती निवडणुका होणार असल्याच्या चर्चा सुरू असून राजकीय वर्तुळात घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्यात अनेक नेते हे शिंदे गटात सामील होताना दिसत आहे. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. अशातच राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमात धोका… astrology
ते म्हणाले की, राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याचा प्रश्नच येत नाही. कारण आमच्याकडे जवळपास १७० आमदार असून त्यात अजून १२ ते १३ आमदार शिंदे आणि फडणवीस यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे आमची संख्या १८२ वर जाऊ शकते. आणि म्हणुनच निवडणुका वेळेवरच होणार, असे सामंतांनी म्हटले आहे.
एलपीजी गॅस सिलिंडरच्या दराबाबत सरकारचा मोठा निर्णय
तसेच प्रत्येक फुटीर गटात एक शिंदे हा असतोच, असे विधान संजय राऊत यांनी सकाळी केले होते. यावर बोलतांना सामंत म्हणाले की, हे करण्याएवढे आम्ही बालवाडी किंवा शाळेत जात नाही. आम्ही देखील चार चार वेळा निवडून आलो आहोत. आमच्यासोबत ५० सीनियर आमदार आहेत. त्यामुळे अशा विधानांनी कोणी विचलित होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चाणक्य नितीः मुलांना या गोष्टींपासून नेहमी ठेवा दूर, नाहीतर भविष्यावर होईल परिणाम!