सटाणाः तालुक्यात जमिनीच्या वादातून पुतण्यानेच केली काकाची हत्या


वेगवान नाशिक

सटाणा : बागलाण तालुक्यात जमिनीच्या वादातून सख्या पुतण्यानेच काकांचा खून केल्याची घटना घडली आहे. रमेश शिवराम भामरे असं मृत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमात धोका… astrology

मिळालेल्या माहितीनुसार बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे येथे प्राथमिक शिक्षक म्हणून रमेश शिवराम भामरे काम पाहत होते. तर दि. १२ रोजी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शिक्षक रमेश भामरे यांचा अपघाती मृत्यू झाल्याची जायखेडा पोलिसात नोंद झाली होती. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याने जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी याबाबत तपास केला    असता त्यांना हा प्रकार संशयित वाटला.

त्यावरून चौकशी दरम्यान  मृत रमेश भामरे यांचा पुतण्या सुजीत सुनील भामरे यानेच भामरे यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने धडक दिली असून भामरे यांच्या डोक्यावर हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याचा अंदाज त्यांना आला आहे. त्यानुसार  जायखेडा पोलिसांनी मुख्य आरोपी सुजित सुनील भामरे (वय- २९) याला अटक केली असून भामरे यांचा खून त्यानेच केल्याची कबुली दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

या शेअरने गुतवणूकदारांना एका वर्षात दिला बंपर परतावा

दरम्यान मृत भामरे आणि पुतण्या सुजित भामरे यांचे अनेक वर्षांपासून वाद असल्याची माहिती जायखेडा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून या  घटनेत पोलिसांना मयत भामरे यांचा पुतण्या सुजीत भामरे याच्यावर दाट संशय आल्याने  सुजीत भामरे याच्या मोबाइलची कॉल डिटेल्स तपासून तो कोणाशी फोनवर बोलला याची कसून चौकशी केली असता तपासात अनेक धक्कादायक खुलासे निष्पन्न झाले आहेत. त्यावरून सुजीत भामरे याला सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी ताब्यात घेतले आहे.

ठाकरे गटाचे एवढे आमदार शिंदे गटाच्या संपर्कात, उदय सामंतांचा दावा

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *