वेगवान नाशिक
राज्यात सध्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधातील वादावरून राजकारण चांगलच तापल आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर असलेले आरोप खोटे असल्याचं म्हणत आमदारकीचा राजीनामा देण्याची जाहीर केलं आहे. त्यावरून राज्यात नेत्यानेत्यामधून अनेक घोषणा दिल्या जात आहे. तसेच विनयभंगाचा आरोप करणाऱ्या भाजपा महिला पदाधिकाऱ्याने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली असून जितेंद्र आव्हाड यांनी ‘तू इथं काय करतेस’ असं म्हणत हाताने जोरात धरून बाजूला लोटल्याचा आरोप केला.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमात धोका… astrology
त्या पीडित भाजपा महिला पदाधिकारी म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रम स्थळावरून परत जात होते तेव्हा मी त्यांना भेटायला जात होते. त्यावेळी मी त्यांच्या पीएंनाही भेट करून देण्याविषयी सांगितलं. तेव्हा सगळेच त्या गाडीला चिकटून चालत होते, कारण मधून चाललं तर जागा मिळणार नसल्यामुळेच मी गाडीला चिकटून दरवाजाकडे जात असतानाचं व्हिडीओतही दिसत आहे.
Brezza CNG लवकरच होणार लॉन्च, किंमत किती पहा
मात्र मी एकनाथ शिंदेंना भेटायला जात असताना समोरून आमदार जितेंद्र आव्हाड आले तेव्हा स्थानिक आमदार असल्याने मी त्यांना पाहून स्मितहास्य केलं. परंतु त्यांनी ‘तू इथं काय करतेस’ म्हणत हाताने जोरात धरून बाजूला लोटत मला धक्का दिला. हा विचार केला नाही की, तिथं सर्व पुरुष होते आणि त्यांनी लोटल्यावर मी आजूबाजूच्या पुरुषांच्याच अंगावर गेले. जे घडलं ते सर्वांसमोर आहे,” असं या भाजपा महिला पदाधिकाऱ्याने सांगितलं.
त्या पुढे म्हणाल्या“या प्रकारानंतर मी डीसीपींकडे जाऊन त्यांना सर्व सांगितलं. तसेच तो व्हिडीओही दाखवला. त्यानंतर त्यांनी मला पोलीस स्टेशनला जाऊन सांगा असं सांगितलं. तेव्हा मी हात लावल्याने माझ्या मनात जी भावना तयार झाली ते जबाबात सांगितलं. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला असल्याचं त्या म्हणाल्या आहे.
ठाकरे गटाचे एवढे आमदार शिंदे गटाच्या संपर्कात, उदय सामंतांचा दावा