वेगवान नाशिक
नाशिकः राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर मागील तीन दिवसात दोन गुन्हे दाखल झालेत. हे गुन्हे खोटे असल्याचे सांगत युवक राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग व शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वात हुतात्मा स्मारक मूक आंदोलन करण्यात आले.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमात धोका… astrology
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर एका महिलेला धक्काबुक्की होईल म्हणून बाजूला सरका या पद्धतीने माजी मंत्री जीतेंद्र आव्हाड यांनी त्या महिलेला बाजूला केले. यात त्या महिलेचा विनयभंग होईल असे प्रसारमाध्यमाच्या चित्रणातून दिसत नसताना सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्या सूडबुद्धीचे राजकारण करत मुद्दाम त्यांची स्वच्छ प्रतिमा मलीन करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप यावेळी युवकांनी केला.
केंद्र सरकारचा सामान्यांना दिलासा, महागाईच्या आकडेवारीत होणार घट
तसेच मागील आठवड्यात एका मंत्र्याने घाणेरड्या भाषेत सुप्रिया सुळे यांच्यावर व्यक्तव्य केलं. परंतु त्या मंत्र्यावर साधा एफ आय आर दाखल का केला गेला नाही. परंतु ७२ तासात जितेंद्र आव्हाड यांच्यावर लागोपाठ दोन गुन्हे दाखल केले हा अन्याय नाही का? आज आम्ही आंदोलन शांततेच्या मार्गाने करीत आहोत परंतु उद्याला जर या आंदोलनाचा उद्रेक झाला तर याला संपूर्णपणे हे सरकार जबाबदार असेल असा इशारा पश्चिम विधानसभा अध्यक्ष नितीन बाळा निगळ यांनी यावेळी दिला.
यावेळी प्रदेश सचिव शादाब सैयद ,राष्ट्रवादी युवक पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळा निगळ, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश धात्रक, जिल्हा युवक सरचिटणिस गोरख ढोकणे,नाशिक रोड अध्यक्ष निखिल भागवत, किरण कातोरे, निलेश सानप, नवराज रामराजे, सागर नागरे, दुर्गेश कबाडे, वैभव झाडे, निलेश भांडुरे, निलेश सानप आदि पदाधिकारी उपस्थित होते.
या शेअरने गुतवणूकदारांना एका वर्षात दिला बंपर परतावा