Nashik धक्कादायक, एका सर्पमित्राने पत्नीसोबतच्या वादाला कंटाळून सापाचचं घेतलं चुंबन,अन् घडल असं..


वेगवान नाशिक

नाशिक : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून सिन्नरमध्ये एका सर्पमित्राने पत्नीच्या त्रासाला कंटाळून पकडलेल्या कोब्रा जातीच्या नागाबरोबर चुंबन घेत जीवन संपवले असल्याचं उघड झालं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमात धोका… astrology

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात गेल्या काही दिवसांपासून सर्पमित्र नागेश श्रीधर भालेराव यांचे  पत्नी सोबत पटत नसल्याने कौटुंबिक वाद होत होते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी नागेश याने  एक व्हिडिओ क्लिप बनवत जीवाचे बरे वाईट करेल असे म्हटले होते. त्यानंतर त्याने शहरातील एका महाविद्यालय परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पकडलेल्या कोब्रा जातीच्या सापासोबत स्टंट करत असताना त्यावेळी चुंबन घेताना सापाने त्याच्या ओठांना दंश केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

या शेअरने गुतवणूकदारांना एका वर्षात दिला बंपर परतावा

दरम्यान सर्पमित्र नागेश व त्याच्या पत्नीचा वाद इतका वाढला की नागेश याने स्वतःची व्हिडिओ क्लिप बनवत पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते. तसेच पत्नीकडून त्याला वेळोवेळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील देण्यात येत असल्याने तो कंटाळून घर सोडून गेल्याचे त्याने क्लिपमध्ये म्हटले आहे. तर या क्लिपमध्ये स्टॅम्प पेपरवर विवाहात फसवणूक झाल्याचा उल्लेख केला असून  पत्नीकडून नागेश व त्याच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास होत असल्याचे त्याने नमूद केले होते.

याबाबतची माहिती नागेशच्या मित्रांना कळताच त्यांनी नागेशला दवाखान्यात दाखल केले परंतु उपचाराअगोदरच नागेशचा  प्राण गेला होता. या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा पसरली असून  परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

एलपीजी गॅस सिलिंडरच्या दराबाबत सरकारचा मोठा निर्णय


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *