नाशिकः संदीप फाऊंडेशन कॅालेज परिसरात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू


वेगवान नाशिक

नाशिकः शहरातील महिरावणी शिवारात संदीप फाऊंडेशन कॅालेजजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबतची माहिती त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याकडून प्राप्त झाली.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमात धोका… astrology

मिळालेल्या माहितीनुसार  दि. ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास महिरावणी शिवारातील संदिप फाऊंडेशनच्या कॅालेजजवळ माऊली मेडिकल समोर नाशिक ते त्र्यंबकेश्वर जाणा-या रोडवर एका अज्ञात वाहनाने दत्तु विठ्ठल आहेर हे त्याच्या दुचाकीवर रस्ता क्रॅास करत असताना त्यास मागून ठोस मारल्याने हा अपघात घडला. या अपघातात दत्तु आहेर यांना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल गेलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

चाणक्य नितीः मुलांना या गोष्टींपासून नेहमी ठेवा दूर, नाहीतर भविष्यावर होईल परिणाम!

याबाबतची फिर्याद लक्ष्मण नंदू रणमाळे यांनी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात दि १२ नोव्हेबर रोजी दिल्याने अज्ञात वाहन चालकाविरोधात भा.द.वि कलम २७९, १३७, ३३८, ३०४अ मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास पोलिस निरिक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एस. के. खैरनार  करीत आहे.

एलपीजी गॅस सिलिंडरच्या दराबाबत सरकारचा मोठा निर्णय


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *