ब्रेकिंग! मालेगावः येथील इमाम परिषदेचे अध्यक्ष एटीएसच्या ताब्यात


वेगवान नाशिक

मालेगावः  नाशिक एटीएसने मोठी कारवाई करत मालेगाव येथून एका मौलानाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मौलानाचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंध असल्याचा संशय असून पीएफआयवर बंदी घातल्यापासून तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा पीएफआयवर सातत्याने कारवाई करत आहेत. एक महिन्यापूर्वी त्यांना मालेगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तात करण्यात आली होती. मात्र एटीएसची त्यांच्यावर करडी नजर होती. अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमात धोका… astrology

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र एटीएसने मौलानाला बंदी घातलेल्या संघटनेच्या पीएफआयशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक केली असून अटक करण्यात आलेल्या या मौलानाचे नाव इरफान दौलत नदवी असे असून मौलाना नदवी हे इमाम परिषदेचे अध्यक्षही आहेत. तसेच त्याला मालेगाव येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या शेअरने गुतवणूकदारांना एका वर्षात दिला बंपर परतावा

PFI ला प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित केल्यापासून, सुरक्षा आणि तपास यंत्रणा त्याच्याशी संपर्क किंवा संबंध असलेल्यांवर सातत्याने कारवाई करत आहेत. त्यात बिहारमधील फुलवारीशरीफ मॉड्युलमागे पीएफआयचा हात असल्याचेही सांगण्यात आले. याप्रकरणी अनेक ठिकाणी वारंवार छापे टाकण्यात आले असून या संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून मालेगावातून आणखी दोन जणांना अटक करण्यात आली होती.

चाणक्य नितीः मुलांना या गोष्टींपासून नेहमी ठेवा दूर, नाहीतर भविष्यावर होईल परिणाम!

खास बाब म्हणजे, कट्टरपंथी इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया  वर दहशतवादी फंडिंग आणि इतर देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याबद्दल 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली असून गृह मंत्रालयाने यूएपीएच्या तरतुदींनुसार या संघटनेवर बंदी घातली आहे. याबाबत 2017 मध्ये एनआयएने गृह मंत्रालयाला पत्र लिहून या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली होती. एनआयएच्या तपासात ही संघटना कथितरित्या हिंसक आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे.

ठाकरे गटाचे एवढे आमदार शिंदे गटाच्या संपर्कात, उदय सामंतांचा दावा


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *