वेगवान नाशिक
सध्या वातावरणात बदल झाला असून हिवाळ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे थंडीचे दिवस असल्याने आहारातही बदल होत असतात. तसेच थंडीने भूक हि मोठ्या प्रमाणात लागते त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात अशा काही पदार्थाचा आहारात समावेश केला जातो, जे खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊब मिळते.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमात धोका… astrology
मात्र हिवाळ्यात आपले आरोग्य बिघडण्याचाही धोका असतो. एखादी छोटीशी चूकही झाली तर सर्दी, खोकला, ताप यासारखे अनेक आजार होऊ शकतात. पण जर आपला आहार चांगला व योग्य असेल तर या आजारांना घाबरण्याची काही गरज नाही. त्याकरता आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हिवाळ्याच्या दिवसात आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत. चला तर त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
राजधानी आणि परिसरात घोंघावतोय 7.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धोका
हिवाळ्याच्या दिवसात हिरव्या भाज्या विशेषत: पालेभाज्यांचे उत्पादन भरपूर होते. अशा वेळी आहारात पालक, मेथी, मोहरी, पुदिना आणि विशेषतः हिरव्या लसूण यांचा समावेश करावा. कारण हिरव्या पालेभाज्यांमुळे शरीराची उष्णता लगेच वाढते, जी थंडीच्या दिवसांसाठी अतिशय योग्य आहे. तसेच घरी कढवलेले किंवा बाहेरून आणलेले शुद्ध देशी तूप आपल्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची पातळी सुधारण्यासाठी तूप हा एक सोपा मार्ग आहे.
सुषमा अंधारेचे पती शिंदे गटात प्रवेश करणार
तसेच हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्या या निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. त्यात गाजर हे त्यापैकीच एक आहे. एका संशोधनानुसार, ज्या लोकांनी तीन आठवड्यांसाठी दररोज सुमारे एक कप गाजर खाल्ले, त्यांच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी आढळून आली. त्यानंतर आहारात काजूचा समावेश करा काजूमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम आणि झिंक अशी अनेक खनिजे असतात. म्हणून यांचे सेवन करणेही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
दिपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला भाजपमधूनच कडाडून विरोध