अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा


वेगवान नाशिक

राज्यात 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी आमचे सरकार नवे धोरण आणणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच मानसिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी आश्रम उभारण्यासाठी मदतीचं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले असून याबाबत फडणवीसांनी घोषणा केली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमात धोका… astrology

याबाबत नागपूर येथे श्रद्धानंद अनाथालयाच्या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री बोलत होते. त्यावेळी मानसिक दृष्ट्या जास्त दुर्बल मुलांची काळजी घेण्यासाठी नागपूरात संस्था नसल्यामुळे नागपूरातील मानसिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या 40 मुलांना उज्जैनच्या सेवाधाम आश्रमाने त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हस्तांतरित करण्यात आले.

केंद्र सरकारचा सामान्यांना दिलासा, महागाईच्या आकडेवारीत होणार घट

तसेच मुख्यमंत्री पदी असतांना महाराष्ट्र सरकारच्या नोकर भरतीत अनाथ मुलांना 1 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. पण, मधल्या सरकारने त्यात बदल केल्याने अशा संस्थेत राहणाऱ्या मुलांना त्याचे फायदे मिळणे कमी झाले होते. मात्र आता  नव्याने आमचे सरकार येताच आता नवीन निर्णय घेतला. यात अनाथांना आरक्षणामुळे फायदा होत आहे. याच समाधान मिळत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यासोबतच या अनाथ मुलांना 18 वर्षानंतर बाहेर पडावे लागत असल्याने तोही प्रश्न मोठा आहे. त्यामुळे अमादार श्रीकांत भारतीय यांनी 18 वर्षीय अनाथ मुलांसाठी पुनर्वसन करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच या संदर्भात महाराष्ट्र सरकार लवकरच एक पॉलिसी तयार करत असून समाजाची जवाबदारी म्हणून समाजातील दुर्बल घटकांसाठी नाथ म्हणून सरकार आणि समाजाने उभ राहिलं पाहिजे असेही फडणवीस म्हणाल आहेत.

चाणक्य नितीः मुलांना या गोष्टींपासून नेहमी ठेवा दूर, नाहीतर भविष्यावर होईल परिणाम!


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *