वेगवान नाशिक
राज्यातील राजकारणात जितेंद्र आव्हाड यांनी एका महिला भाजपा कार्यकर्त्याला बोललेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर आरोप केले जात आहे. त्यात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हे आरोप खोटं असल्याचं म्हणत आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं म्हटले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले असून राज्यभरातून देखील अनेक नेत्यांनी यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमात धोका… astrology
यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आव्हाड यांना टोला लगावला असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी सहानुभूती मिळवण्यासाठी आमदारकीचा राजीनामा द्यायचं नाटक असून ही सर्व स्टंटबाजी असल्याचं बावनकुळे यांनी म्हटले आहे.
एलपीजी गॅस सिलिंडरच्या दराबाबत सरकारचा मोठा निर्णय
तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी या सुप्रिया सुळे यांच्या मागणीवर देखील बावनकुळे यांनी टीका केली. अशी काय परिस्थिती निर्माण झाली आहे? त्यांचे नेते गंभीर गुन्हे करत आहेत. आव्हाडांनी गंभीर गुन्हा केल्यामुळे काही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांना निलंबित करा. कारण आव्हाड यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा सीसीटीव्हीचे फुटेज पाहूनच झाला आहे. महिला समोरून येत होत्या तर तुम्ही मागे का नाही सरकले? तुम्ही बाजूला का नाही गेलात? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.
या शेअरने गुतवणूकदारांना एका वर्षात दिला बंपर परतावा