वेगवान नाशिक
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. महागाईमुळे काय घ्यावे आणि काय खावे असा प्रश्न नागरिकांना भेडसावत होता. मात्र केंद्र सरकारने आता दिलादायक बातमी दिली असून सर्वसामान्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. त्यात मागील महिन्यांच्या तुलनेत सध्याची महागाई पाहता महागाई कमी झाली असून ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाईचा दर 8.39 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे दर महिन्यानुसार महागाईत घट झाली असून, जनतेला सततच्या वाढत्या महागाईपासून दिलासा मिळाला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमात धोका… astrology
दरम्यान सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दर 10.7 टक्के होता तर ऑगस्टच्या महिन्यात 12.41 टक्क्यांच्या तुलनेत त्यात घट झाली. त्यात आलेला डेटा सलग 18 व्या महिन्यात घाऊक महागाई दर दहा अंकांपेक्षा जास्त दर्शवत होता. तसेच आज संध्याकाळी किरकोळ महागाईची आकडेवारीही जाहीर होणार असून, याकडे रिझर्व्ह बँकेसह, उद्योजक आणि बाजाराचेही लक्ष लागले आहेत.
या शेअरने गुतवणूकदारांना एका वर्षात दिला बंपर परतावा
‘या’ क्षेत्रात महागाई झाली कमी
तसेच अनेक क्षेत्रांतील महागाईच्या आकडेवारीत घट झाली असल्याने उत्पादित उत्पादनांचा महागाई दर मागील महिन्यात 6.34 टक्क्यांवरून 4.42 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे इंधन आणि उर्जा विभागाचा महागाई दरही गेल्या वेळी 32.61 टक्क्यांवरून 23.17 टक्क्यांवर आला आहे.
Brezza CNG लवकरच होणार लॉन्च, किंमत किती पहा