एलपीजी गॅस सिलिंडरच्या दराबाबत सरकारचा मोठा निर्णय


वेगवान नाशिक

नवी दिल्ली: देशभरातील गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींबाबत सरकारी तेल कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला असून आता तुम्हाला गॅस सिलिंडर घेण्यासाठी आणखी रुपये खर्च करावे लागणार आहे. कारण सर्वसामान्यांसाठीची एलपीजी सिलिंडरवरील सवलत आता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी भार  वाढणार आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना प्रेमात धोका… astrology

दरम्यान देशातील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवरील सवलत रद्द करण्यात आली असल्याने  व्यावसायिक सिलिंडरवर मिळणारी २०० ते ३०० रुपयांची सवलत आता बंद झाली आहे, त्यामुळे हे सिलिंडर कमी किमतीत मिळणार नाहीत.

याबाबत निर्णय हा व्यावसायिक सिलिंडरवर अधिक सवलत देणाऱ्या वितरकांच्या तक्रारी लक्षात घेऊन  घेण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, HPCL आणि BPCL या तिन्ही सरकारी तेल कंपन्यांनी त्यांच्या वितरकांना ही सवलत बंद करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात तसे आदेशही जारी झाले आहेत.

हिवाळ्यात या आजारांपासून दूर राहण्याकरिता या सुपरफूडचा आहारात करा समावेश

नवीन निर्णयानुसार, इंडियन ऑइलने १९ किलो आणि ४७.५ किलोचे सिलिंडर असलेले इंडेन सिलिंडर ग्राहकांना आणि वितरकांना कोणत्याही सवलतीशिवाय विकले जावेत, असा आदेश जारी केला आहे. तसेच IOC ने असेही म्हटले की इंडेन जंबो (४२५ किलो) सिलिंडरसाठी, प्लांटच्या मूळ किमतीवर ५,००० रुपये प्रति मेट्रिक टन पेक्षा जास्त सूट दिली जाऊ नये.
तेलाच्या किमतींवर कसा परिणाम होणार
मात्र, तेल कंपन्यांच्या या निर्णयामुळे तेलाच्या किमतींवरही परिणाम दिसू शकतो कारण ते वितरकांना सवलत म्हणून देत असलेली रक्कम आता कमी होणार आहे.

सुषमा अंधारेचे पती शिंदे गटात प्रवेश करणार


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *