बाजार समितीवर लिलाव सुरु होण्याच्या वेळेत झाला बदल,शेतकरी व व्यापाऱ्यांची होती मागणी


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे,

मनमाड,नांदगाव-

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक श्री.सी.आर.विघ्ने यांनी 9 नोव्हेंबर 2022 रोजी थेट बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या लिलाव ठिकाणी जाऊन पाहणी केली.

बाजार समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांचे समवेत चर्चा केली तसेच शेतकरी व व्यापारी वर्गाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.यावेळी सचिव विश्वास राठोड,अधिकारी बळीराम गायकवाड, साहेबराव घुगे,नानासाहेब उगले,वसंत घुगे,नितीन दराडे आदींसह बाजार समितीचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.

शेतकरी व व्यापारी यांच्या हितासाठी श्री.विघ्ने यांनी विचार विनिमय करून बाजार समितीला काही सुचना दिल्या त्यानुसार;

1) शेतकरी बांधवांनी लिलावाच्या वेळेत बदल करण्याची मागणी नुसार सोमवार दि.14/11/2022 पासुन कांदा व मका लिलाव हा सकाळी 09:30 वाजता सुरू करण्यात येणार आहे तर धान्य लिलाव देखील सकाळी 10:00 वाजता सुरू करण्याच्या हालचाली सुरु आहेत.

2) व्यापारी बांधवांच्या मागणीनुसार बाजार समितीचे कामकाज ऑनलाईन व संगणकीकृत करण्याचे काम जवळ जवळ पूर्ण झाले असून सध्या प्रायोगिक तत्वावर कामकाज चालू आहे.वरिष्ठ कार्यालयाची परवानगी मिळताच बाजार समितीचे ऑनलाईन संगणक प्रणाली 100% क्षमतेने कार्यान्वित करण्यात येईल.

3) बाजार समिती आवारातील शौचालय दुरुस्त करून शेतकरी व व्यापारी वर्गास उपलब्ध करून दिले जाणार आहे.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *