वेगवान नाशिक
नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यात जगभरातील टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. यामागे चुकलेली धोरणे आणि व्यवस्थापनातील बदल ही कारणे समोर येत असली तरी, आर्थिक मंदीची चाहूल हे प्रमुख कारण असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस
त्यात Twitter, Facebook, Netflix, Microsoft, Snapchat सह इतर अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबिल्यामुळे अनेक जण झटक्यात बेरोजगार झाले आहेत. तर यातील अनेक कंपन्यांनी यापूर्वी विस्तार करण्याच्या नावाखाली, नवी प्रकल्पासाठी कर्मचाऱ्यांची मोठी भरती केली. परंतु, अवघ्या काही महिन्यातच कंपन्यांनी नोकर कपातीचे पाऊल उचलले. त्यामुळे काही दिवसताच कर्मचाऱ्यांसमोर दुसरी नोकरी शोधण्याचे संकट उभे येऊन राहिले आहे.
बाजार समितीवर लिलाव सुरु होण्याच्या वेळेत झाला बदल,शेतकरी व व्यापाऱ्यांची होती मागणी
तसेच कंपनी उत्पादनात अग्रेसर असली तरी मंदीच्या भीतीने कंपनीने गेल्या महिन्यात 1000 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले होते. या वर्षातील कंपनीची ही तिसरी मोठी कर्मचारी कपात आहे. त्यामुळे कर्मचा-यांना मोठा फटका बसणार आहे.
यामध्ये सर्वाधिक फटका हा Facebook च्या कर्मचाऱ्यांना बसलाय. कारण या कंपनीने तब्बल 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यसाठी हे पाऊल टाकत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. तसेच कर्मचाऱ्यांना आता दुसऱ्या ठिकाणी नोकरी शोधण्याचे संकेत देण्यात आले आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देण्यात येणार- दीपक केसरकर