वेगवान नाशिक
सध्या टी-20 वर्ल्ड कपच्या मॅचेच सुरू असून सामने खेळले जात आहे. त्यात आता फायनल पर्यंत सामने येऊन पोहचले आहे. तर टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलआधी एक दिवस क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली असून ICC च्या अध्यक्षपदी ग्रेग बार्कले यांची निवड करण्यात आली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस
या आधीचे असलेले अध्यक्ष तवेंगवा मुकुहलानी पदावरून पायउतार झाल्यानंतर ग्रेग बार्कले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच
येत्या दोन वर्षांसाठी त्यांची पदावर नियुक्ती केली असल्याचं सांगितले जात आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड होणे ही एक सन्मानाची गोष्ट असून मी माझ्या सहकारी आयसीसी संचालकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानू इच्छितो, अशी प्रतिक्रिया बार्कले यांनी पुनर्नियुक्तीवर दिली आहे.
गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर हि बँक देतेय सर्वात कमी व्याजदर
त्यासोबतच आयसीसीने क्रिकेटच्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी रोडमॅप तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असल्याचंही बार्कले यांनी सांगितलं. याआधी 2020 साली ग्रेग बार्कले यांनी आयसीसीचं अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यासोबतच बार्कलेंनी न्यूझीलंडच्या क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि 2015 च्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपचे संचालक होते. त्यामुळे बीसीसीआयनेही बार्कले यांच्या निवडीसाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे.
ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाड यांना कोर्टाने सुनावली न्यायालयीन कोठडी