निफाडः तालुक्यात दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू तर एकजण जखमी


वेगवान नाशिक

निफाडः  लासलगाव विंचूर रस्त्यावर भगरीबाबा मंदिरासमोर दुचाकीचा अपघात  झाल्याची घटना घडली असून  एकाचा मृत्यू तर एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा  नोंदवण्यात आला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस

दरम्यान निफाड तालुक्यातील लासलगाव ते विंचूर या रस्त्यावर भगरीबाबा मंदिरासमोर भरधाव वेगातील दुचाकीने समोरून चाललेल्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला असून या अपघातात अन्य एकजण जखमी झाला असल्याची माहिती लासलगाव पोलिसांनी दि ११ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दिली आहे.

या कंपन्यांच्या कर्मचा-यांना बसणार फटका, मोठ्या प्रमाणावर होणार कर्मचारी कपात

पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दुचाकी (क्र. एम. एच. ४१ यू ०३२३) वरील आरोपी नाव गाव माहित नसून याने त्याच्या ताब्यातील दुचाकी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून फिर्यादीची दुचाकी (क्र. एम एच १५.एचए १३०८) हिस पाठीमागून ठोस मारून अपघात केला.

गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर हि बँक देतेय सर्वात कमी व्याजदर

या अपघातात फिर्यादीचा मुलगा धनराज विलास गोंधळे (वय २२), रा. पिंपळद ता. चांदवड येथील यास जबर मार लागला असून अपघातात मयत झाला असल्याचं पोलिसींनी सांगितले. तर फिर्यादीचा भाचा भारत साहेबराव गांगुर्डे यास किरकोळ मार लागून तोही जखमी झाला असल्याच लासलगाव पोलिसांनी सांगितले. याबाबत अज्ञात आरोपी विरूद्ध लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देण्यात येणार- दीपक केसरकर


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *