वेगवान नाशिक
नाशिकः शहरातील सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील कार्यालयात जाण्यासाठी बनावट ओळखपत्रासह कंपनीत प्रवेश करण्याचा प्रयत्न एका महिलेने केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सपना रामनाथ वैद्य ( 30) या महिलेने महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या प्रवेशद्वारावर दि.9 सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास बनावट ओळखपत्राच्या आधारे अनधिकृत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. कंपनीत मुलांना कामासाठी भरती करावयाचे असल्याचे सांगत महिलेने बनावट ओळखपत्र सुरक्षारक्षकांना दाखवले.
ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाड यांना कोर्टाने सुनावली न्यायालयीन कोठडी
मात्र सुरक्षारक्षकांना संशय आल्याने त्यांनी ओळखपत्राची पडताळणी केली असता ओळखपत्र बनावट असल्याचे समोर आले. महिलेला हे ओळखपत्र संशयित सचिन सुरेश जाधव (35), रा. सुकेणे, ता. निफाड व सुनील भंडारी यांनी बनवून दिल्याचेही समोर आले. त्यामुळे विनय प्रकाश जाधव यांनी सातपूर पोलीस ठाण्यात संशयित महिलेसह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सातपूर पोलीस पुढील तपास करीत आहे.
गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर हि बँक देतेय सर्वात कमी व्याजदर